दासबोध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर येथे आज दिनांक 6/7/2027 रोजी दासबोध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमासाठी दासबोध सखोल कोल्हापूर विभागाचे प्रमुख स.भ.श्री. बाळासाहेब पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.त्यांनी सोप्या भाषेमध्ये समर्थ विचार विद्यार्थ्यांमध्ये पोचवून मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या सौ मेहता मॅडम, मुख्याध्यापिका सौ देशपांडे मॅडम व पर्यवेक्षिका सौ इनामदार मॅडम व सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
समर्थ विद्यापीठ सातारा मार्फत दरवर्षी या परीक्षा घेण्यात येतात. समर्थ रामदास स्वामींचे विचार बालवयात मनात रुजून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे हा या परीक्षांचा हेतू आहे. दासबोध प्रथम व द्वितीय या दोन्ही परीक्षांमध्ये शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले आहे. दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक दोन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक व तीन विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शाळेतील सौ पाटणकर मॅडम व कु. देवधर मॅडम यांचे मार्गदर्शन व शाळेतील सर्व वरिष्ठांचे प्रोत्साहन लाभले.